ब्रुकफिल्ड प्रॉपर्टीज मुंबईतील पहिली झीरो वेस्ट रन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रुकफिल्ड प्रॉपर्टीजने द रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने 11 व्या पवई रनमध्ये मुंबईतील पहिल्या झीरो वेस्ट रनचे आयोजन केले होते. यंदाच्या वर्षीचा विषय #BreakThePlasticHabit ला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच शून्य कचरा वातावरणात आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही चार कि.मी. अंतराची मॅरेथॉन घेण्यात आली. ब्रूकफिल्ड प्रॉपर्टीजच्या हिंदुस्थानातील  पोर्टफोलिओपैकी कार्यालयीन संपत्तीचा एक प्रमुख समूह असलेल्या पवई बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये 26 जून 2022 रोजी सीएक्सओ रनला  अंकुर गुप्ता (व्यवस्थापकीय भागीदार आणि रिअल इस्टेट इंडिया आणि मिडल ईस्टचे प्रमुख, कंट्री हेड- इंडिया, ब्रुकफिल्ड ऍसेट मॅनेजमेंट) यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि कम्युनिटी-रनला  विठ्ठल सूर्यवंशी, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रादेशिक प्रमुख-पश्चिम, ब्रुकफिल्ड प्रॉपर्टीएस यांनी रनला हिरवा झेंडा दाखवला.