तलावांत समाधानकारक पाऊस; तीन दिवसांत सहा दिवसांचे पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत सध्या समाधानकारक पाऊस सुरू झाला असून गेल्या तीन दिवसांत सहा दिवसांसाठी पुरेल इतके पाणी जमा झाले आहे. मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. 29 जून रोजी तलावात 1,47,006 दशलक्ष लिटर पाणी जमा होते. 3 जुलै रोजी सकाळी हा जलसाठा 1,70,520 दशलक्ष लिटरवर गेला आहे. त्यामुळे या वर्षी जोरदार पाऊस सुरू होण्यास जुलै उजाडला असला तरी सध्याची स्थिती मुंबईसाठी समाधानाची बाब आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यातील 27 टक्के पाणी गळतीमध्ये वाया जात असल्याने काही भागांत पाणीपुरवठय़ावर परिणाम होते. यातच गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास जूनअखेर उजाडत असल्याने तलावांतील पाणीसाठा तळ गाठत आहे. या वर्षीही हीच स्थिती राहिल्याने पालिकेने मुंबईत 27 जून 2022 पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे.

1 ऑक्टोबर रोजी वर्षाचे नियोजन

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन नियोजन केले जाते. 1 ऑक्टोबर रोजी सातही तलावांत मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची आवश्यकता असते.

सध्याचा पाणीसाठा

मोडक सागर – 45818 दशलक्ष लिटर

तानसा – 10193 दशलक्ष लिटर

वैतरणा – 6 16900 दशलक्ष लिटर

भातसा – 78180 दशलक्ष लिटर

विहार – 4677 दशलक्ष लिटर

तुलसी – 2006 दशलक्ष लिटर