आम्हाला धोका दिला, मुंबईला देऊ नका – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे कारशेडच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला धोका दिला, तसा मुंबईला धोका देऊ नका, असे ते आरे कारशेडप्रकरणी म्हणाले. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असेही ते म्हणाले. आरेचे जंगल मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

आरेसाठी दोन पर्याय आहेत. कांजूरमार्ग किंवा गोरेगाव पहाडी हे दोन पर्याय आहेत. मेट्रोच्या सहाव्या मार्गासाठी कारशेड तयार झाली नव्हती. एमएमआरडीएचे 2018 मधील पत्र कांजूरमार्गसाठी आहे. पहाडी गोरेगाव, कांजूरमार्ग किंवा बीकेसी या पर्यायांवर त्यावेळी काम सुरू होते. सरकार बदलल्यावर परिस्थिती बदलते. मात्र, मुंबईवर घाला घालणे हा सरकारचा पहिला निर्णय असू शकत नाही. या निर्णयामुळे मुंबईला धोका आहे. त्यामुळे मुंबईचा, मुंबईकरांचा विचार करा, अशी विनंती आपण त्यांना करत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याआधी कधीही आमदार आणि प्रसारमाध्यमांमध्ये दोरी नव्हती. आता त्यांना प्रसारमाध्यमे पळवून गुवाहाटीला नेणार आहेत,की आम्ही त्यांना पळवणार आहोत, का तेच पळून जाणार आहेत. एवढी भीती कशाला आणि कोणाची, असा सवालही त्यांनी केला. कोणत्याही आमदाराला धोका नसताना, सरकार त्यांचे असताना एवढा बंदोबस्त या परिसरात पहिल्यांदाच आहे. कसाबच्यावेळी किंवा इथर कधीही मुंबईतएवढा बंदोबस्त आपण बघितला नव्हता, असेही ते म्हणाले.