रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी केली परशुराम घाटाची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पावसामुळे दरड आणि माती ढासळत असल्याने सुरक्षितीतेसाठी प्रशासनाने वाहतुकीसाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घाटाची पहाणी शनिवारी जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

सध्या घाटात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरड देखील कोसळत आहे. त्यामुळे घाट गेल्या 6 तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या धोकादायक बनलेल्या घाटाची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केली. यावेळी त्यांनी महत्वाच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, कल्याण टोलवेजचे अधिकारी व अभियंते, इगल इन्फ्रा कंपनीचे अभियंते, उप विभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग श्री. प्रकाश निगडे, अभियंते मराठे, पंडित तसेच संबंधित ठेकेदारांचे कर्मचारी उपस्थित होते.