
उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून आलेल्या अहवालानंतर त्यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होईपर्यंत आणि त्याचे निकाल जाहीर होईपर्यंत गृह मंत्रालयाने त्यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. दिल्ली पोलिसांचे जवान त्यांना ही सुरक्षा देणार आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्टला मतदान होणार आहे.


























































