कर्जवसुलीसाठी केले रिक्षाचालकाचे अपहरण, मालाड येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

कर्जवसुलीसाठी रिक्षाचालकाला मारहाण करून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहरणप्रकरणी विजय ऊर्फ बबलू चौरसिया, अझरुद्दीन शेख आणि सिराज सलीम शेखला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मालाडला राहणारा संतोष महंतो भाडय़ाने रिक्षा चालवतो. तो जी रिक्षा चालवतो त्या मालकाने काही वर्षांपूर्वी कर्जावर रिक्षा घेतली होती. आर्थिक कारणास्तव कर्जाचे हप्ते भरले गेले नव्हते. सोमवारी नेहमीप्रमाणे संतोष हा रिक्षा घेऊन निघाला. सायंकाळी तो मालाडच्या इन्फिनिटी मॉलजवळ आला. तेव्हा विजय, अझरुद्दीन आणि सिराजने त्याला थांबवले. लोनचे हप्ते भरले नाही. त्याची वसुली करायची म्हणून त्या तिघांनी रिक्षाची चावी घेतली. त्यानंतर त्या तिघांनी संतोषच्या हातात एक कागद देऊन पह्टो काढला. त्यातील एक जण संतोषची रिक्षा घेऊन गेला.

संतोष पोलीस नियंत्रण कक्षाला पह्न करत असतानाच त्या तिघांनी त्याला दुसऱया रिक्षात नेले. मिठ चौकी येथून संतोषला मारहाण करून बोरिवली येथे घेऊन जात होते. रिक्षा हळू झाल्यावर संतोष हा रिक्षातून उतरला. त्याने याची माहिती त्याच्या मालकाला दिली. मालकाने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे याच्या पथकातील उपनिरीक्षक पीयूष तरे याने तपास सुरू केला. त्यावरून पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले.