आरोग्य – मंकी पॉक्सला घाबरू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिकेत मुळे

मंकी पॉक्स हे सामान्यतः आफ्रिकेच्या काही भागांमध्ये संक्रमित वन्य प्राण्यांमध्ये आढळले. 1958 मध्ये पहिल्यांदा जिथे हा विषाणू सापडला तिथे संशोधनासाठी माकड ठेवण्यात आले होते. त्याच वेळी 1970 मध्ये मानवांमध्ये या विषाणूची प्रथम पुष्टी झाली. मंकी पॉक्स विषाणूचे दोन वेगळे अनुवांशिक गट आहेत, मध्य आफ्रिकन आणि पश्चिम आफ्रिकन. मानवांमध्ये मध्य आफ्रिकन मंकी पॉक्स विषाणू अधिक गंभीर आहे आणि पश्चिम आफ्रिकन विषाणूपेक्षा मृत्युदर जास्त आहे.

केरळच्या कोल्लम जिह्यातून मंकी पॉक्सचं हिंदुस्थानातलं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. केरळमधला हा रुग्ण नुकताच परदेशातून आला होता. मंकी पॉक्सची लक्षणं दिसल्यानंतर या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मंकी पॉक्स म्हणजे काय?

मंकी पॉक्स हा एक विषाणूच्या संसर्गातून पसरणारा सामान्य आजार आहे. हा रोग याचा संसर्ग झालेल्या प्राण्यांमार्फत मानवामध्ये पसरतो. याला झुनोसिस असेदेखील म्हटले जाते.

ज्या व्यक्तीला याचे संक्रमण झालेले असते अशा व्यक्तीत याच्या फ्लूची लक्षणे आढळून येत असतात. या आजाराचे संक्रमण झालेल्या रुग्णाला न्युमोनिया हा आजार होण्याची शक्यतादेखील असते. मंकी पॉक्सची लक्षणे स्मॉल पॉक्सच्या लक्षणांसारखीच असतात, परंतु ते सौम्य असतात आणि संसर्ग झाल्यानंतर 7-14 दिवसांनी ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा येतो. सामान्य लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा येणे आणि लसिका ग्रंथी सुजणे यांचा समावेश होतो. मंकी पॉक्स विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीमध्ये दूषित पदार्थ जसे की जखम, शारीरिक द्रव, श्वसनाचे थेंब आणि बिछाना यांच्या संपका&तून पसरतो. कमी शिजलेले मांस आणि संक्रमित प्राण्यांचे इतर प्राणी उत्पादने खाणे हे संभाव्य जोखीम घटक आहे. हे प्लेसेंटाद्वारे आईपासून गर्भातदेखील प्रसारित केले जाऊ शकते. हा विषाणू शिंकणे आणि खोकल्यामुळेदेखील पसरतो.

मंकी पॉक्स या आजाराची लक्षणे कोणकोणती आहेत?

ताप येणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, थंडी वाजणे, थकवा येणे, पंबर दुखणे, पाठदुखी, शरीरावर कांजिण्यासारखा पुरळ येणे.
जर तुम्हाला मंकी पॉक्सची लागण झाली असेल तर पहिली लक्षणे दिसण्यासाठी साधारणतः 5 ते 21 दिवस लागतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थरथर कापणे आणि थकवा यांचा समावेश होतो. ही लक्षणे दिसल्यानंतर एक ते पाच दिवसांनी चेहऱयावर पुरळ उठते. लक्षणे सहसा दोन ते चार आठवडय़ांत स्पष्ट होतात.

संक्रमण टाळण्याचे मार्ग कोणते
संक्रमित प्राण्यांच्या संपका&त येणे टाळा, आजारी प्राणी आणि मानव यांच्यापासून अंतर ठेवा, संक्रमित रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवा, स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि नेहमी झ्झ्ं कीटचा वापर करा. हा विषाणू कोविडहून वेगळा आहे. याचा संसर्ग होण्याची पद्धतही वेगळी आहे. मंकी पॉक्सच्या उपचारासाठी औषध आणि लस दोन्ही उपलब्ध आहे. घाबरण्याची गरज नसून केवळ काळजी घेणं गरजेचं आहे.

(लेखक मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट आहेत)