
ओबीसी आरक्षणानुसार 29 जुलैला सोडत जाहीर करण्यात आल्यानंतर आतापर्यंत 399 हरकती सूचना नोंदवण्यात आल्या आहे, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, आलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी होणार नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2022’ करिता 236 प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ व सोडत नुकतीच काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार व त्यानुसार निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार 2 ऑगस्टपर्यंत 399 सूचना हरकती प्राप्त झाल्या आहेत





























































