आपला अभिमान.. आपले राष्ट्रगीत.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जगातील सर्वच देशांमध्ये धाजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. आपल्या धजाइतकाच आपला अभिमान म्हणजे आपले राष्ट्रगीत. आपल्यापैकी प्रत्येकालाच राष्ट्रगीत तोंडपाठ असणे अपेक्षित आहे. रवींद्रनाथ टागोरांची ही रचना मूळ बंगाली भाषेत “भारतो भाग्य बिधाता” या शीर्षकाने लिहिले गेले. आपले राष्ट्रगीत देशाची धार्मिक, प्रादेशिक विविधता आणि एकता दर्शविते.

  • १ डिसेंबर १९११ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात हिंदुस्थानचे राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
  • मूळ राष्ट्रगीत वंग भाषेत आहे. संपूर्ण गीतात पाच श्लोक आहेत. यापैकी फक्त पहिला श्लोक सामान्यत: गायला जातो.
  • १९१९ मध्ये morning song of India या नावाने आपल्या राष्ट्रगीताचे इंग्लिश भाषेत भाषांतर करण्यात आले.
  • १९०५ मध्ये प्रथमच राष्ट्रगीताचा मजकूर तत्वबोधिनी मासिकात प्रकाशित झाला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ११ सप्टेंबर १९४२ रोजी जर्मन इंडियन सोसायटीच्या बैठकीत “जन गण मन” हे राष्ट्रगीत म्हणून जाहीर केले होते. १९५० मध्ये या गीताला राष्ट्रगीताचा औपचारिक दर्जा देण्यात आला.
  • आपले राष्ट्रगीत ५२ सेकंदात गायले जाऊ शकते.
  • राष्ट्रगीताची हिंदी आवृत्ती २४ जानेवारी १९५० रोजी संविधानसभेने स्वीकारली.
  • हिंदुस्थानचे राष्ट्रगीत निवडण्याचे श्रेय सुभाषबाबुना जाते. कारण ते राष्ट्रगीत निवडसमितीतील प्रमुख व्यक्ती होते.
  • राष्ट्रगीताचा हिंदी – उर्दू अनुवाद करण्याचे श्रेय कप्तान आबिद हसन सफारानी यांना जाते.