
जुन्या वादातून टोळक्याने अल्पवयीन मुलाला दगड आणि लोखंडी पट्टीने मारहाण करून खुनी हल्ला केला. ही घटना 22 ऑगस्टला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हडपसरमधील वैदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली.
इरफान गुलाब महमंद शेख उर्फ टिल्ली वय 18 रा. रामटेकडी असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य कांबळे (वय 17) याने तक्रार दिली आहे.
आदित्य आणि इरफान एकमेकांच्या ओळखीचे असून परिसरात राहायला आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद असल्यामुळे 22 ऑगस्टला टोळक्याने आदित्यला गाठले. त्याला दगडाने आणि लोखंडी पट्टीने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष डांगे तपास करीत आहेत.
































































