आठ वर्ष कर्जाचा डोंगर, बिग बॉसमध्ये जाण्यासाठीही केली होती उधारी, उर्फी जावेदचा खडतर प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेत असेलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या कपड्यांमुळे नव्हे तर तिच्या आयुष्यातील खडतर प्रवासामुळे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतील आपल्या खडतर प्रवासाला उजाळा देत आठ वर्ष कर्जाचा डोंगर आणि बिग बॉसमध्ये जाण्यासाठीही उधारी केली असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे तिचे चाहतेही हैराण झाले आहेत.

उर्फी जावेदने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासाविषयी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उर्फीला विचारण्यात आले होते की, ती मीडियाला पैसे देऊन बोलावते. यावर उत्तर देताना उर्फीने सांगितले की, मी काइली जेनर आहे का? कुठून आला पैसा? मी अंबानीची मुलगी आहे का ? कधी लोकं सांगतात माझ्याकडे कपडे घालण्यासाठी पैसे नसतात. तर दुसरीकडे तिच लोकं सांगतात मी मीडीयाला पैसे देते. तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे एवढे पैसे कुठून येत असतील. तुम्हाला खरेच असे वाटते का मी कोणाला पैसे देऊन फोटो काढायला बोलवत असेन?

उर्फीने पुढे सांगितले की, ती गेल्या 8 वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात जात होती त्यावेळीही ती पैसे उधार घेऊऩ आली होती. त्यावेळी जे काही कपडे घातले होते ते सगळे उधारीचे होते. जेव्हा मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आली त्यावेळी माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. दुर्देवाने त्या शोमध्येही मी एक आठवडाच टिकले. त्यामध्ये पण काही खास पैसे कमावले नव्हते. पण आता मी काही करुन पैसे कमावत आहे  आणि जे मी चांगल्या पद्धतीने करु शकत आहे तर त्यानेच का मी पैसे कमाऊ नये ?

उर्फीने पुढे सांगितले की, मुंबईत आठ वर्ष छोटे-छोटी काम करुन कसातरी गुजारा करत होते. जे हाताला काम मिळायचे ते करायचे. मन नसतानाही मी कामं केली आहेत. 15 मालिकेंमध्ये काम केले मात्र कुठूनच मला यश मिळाले नाही. मी 2500 रुपयांपासून सुरुवात केली होती आणि शेवटचे मी एका वेबसिरीजमध्ये काम केले होते, ज्यामध्ये मला 18 हजार रुपये मिळाले होते.