प्रबोधनकारांना राज्यभरात अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त महाराष्ट्र चळकळीतील अग्रणी, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात किकिध ठिकाणी प्रबोधनकारांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिकादन करण्यात आले. प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त किकिध सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले.

शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने बोरिवली येथे प्रबोधनकारांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, उपनेत्या संजना घाडी, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे उपस्थित होते. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर व आमदार, सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्र. 37  च्या वतीने महिला विधानसभा संघटक पूजा चौहान व शाखाप्रमुख मनोहर राणे यांनी रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटी यांच्या सहकार्याने गोरेगाव येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर, मुलांना मोफत चष्मा वाटप व जेष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्र्ाक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सुनील प्रभू, रिना सुर्वे, सुनिल गुजर, गणपत वारिस आदी उपस्थित होते. तर संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागाच्या वतीने दादर पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, मुंबई विभागीय अध्यक्ष दिनेश महाडिक, सचिव गणपत गावकर आदी उपस्थित होते.

 शिवसेना शाखा क्रमांक 19 च्या वतीने प्रबोधनकार ठाकरे चौक चारकोप येथे प्रबोधनकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, माजी नगरसेविका शुभदा गुढेकर, विभाग संघटक संतोष राणे, उपविभागप्रमुख राजू खान, राजन निकम, शाखाप्रमुख निखिल गुढेकर, श्याम मोरे व मनोज मोहिते आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांनी केले होते.