
अखंड नऊ दिवस उपवासाचा शरीरावर आणि मनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. अशावेळेस या फळांच्या सेवनाने ताण दूर होऊन मन ताजेतवाने राहते.
१) पपई – पपईत क जीवनसत्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. शिवाय पपईच्या नियमित सेवनाने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. तसेच कर्करोगापासून आपला बचाव होतो.
2) संत्रे – याच्या ताज्या सुगंधाने मनावरील ताण कमी होतो. त्वचेसाठी संत्र्याची साल उपयुक्त ठरते. ही साल उन्हात सुकवून त्याची बारीक पूड करावी. थड्या दुधात आणि सायीत मिसळून ही पूड चेहरयाला लावावी. त्वचा उजळते.
३) पेरू – सर्वात जास्त क जीवनसत्वाचा साठा पेरूत आढळतो. एका पेरूत ३७६ मिलीग्राम क जीवनसत्व असते. हे आपल्या शरीराची आठवड्याभराची गरज भागविते. पेरूच्या नियमित सेवनाने वजन कमी होते. थायरोईड, बद्धकोष्ठ असे विकार बरे होतात. शिवाय कॉलेस्टेरोल कमी करण्याच्या क्षमतेमुळे रक्तदाबही आपसूकच कमी होतो.
४) केळी – केळ्यात कर्बोदके आणि जीवनसत्वे दोन्ही असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक केळे खावे. त्यामुळे डोके शांत राहते. तणावाच्या परिस्थितीत केळ्याच्या सालीपासून केलेला चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.



























































