चंद्रपूरात शिवसेनेच्या गीतावर गरब्यात धूम, प्रेक्षकांचं लक्ष वेधलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारदोत्सव नवरात्रीला उत्साहात सुरवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धार्मिक वातावरण आहे. जिल्ह्यात ठिक ठिकाणी दुर्गादेवी, शारदा देवी यांच्या मूर्तीची स्थापनाअनेक मंडळांमध्ये करण्यात आलेली आहे.

दोनवर्षा नंतर जिल्ह्यात दांडियाचा धूम आहे. शहरातील रामनगर परिसरात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांच्या नेतृत्वात जय भवानी गरबा मागील 21 वर्षा पासून सुरू आहे. शेकडो गरबा रसिकांनी जय भवानी गरबामध्ये सहभाग घेतला आहे. या गरब्यामध्ये जात धर्म गोत्र आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना या गाण्यावर रसिकांनी नृत्य करत प्रेक्षकांच लक्ष वेधलं. जय भवानी गरब्या मध्ये प्रेक्षकांनी अलोटगर्दी केली आहे. या गरब्याचे संचालन शिक्षकसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायडू हे करत आहे.