
गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधला एक जबरदस्त अभिनेता म्हणून उदयाला आलेल्या पंकज त्रिपाठींच्या हाती एक जबरदस्त भूमिका लागली आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावरील चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
पंकज त्रिपाठीने स्वत: इंस्टाग्रामवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ”भारत जमीन का तुकडा नाही, जीता जागता राष्ट्रपुरुष है! या ओळी लिहणारे महान नेते श्री अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. #ATAL लवकरच”, असे पंकज त्रिपाठी यांनी ट्विट केले आहे.
























































