नाकात बोट घालणे धोकादायकच !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाकात बोट घालणे ही एक अत्यंत साधी आणि सामान्य सवय वाटत असली तरी ती फार धोकायादयक आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे पटणार नाही. पण संशोधकांनी केलेल्या संशोधनात खरोखरच ही बाब पुढे आली आहे. तुम्ही जर नाकात बोट घालण्याचा अतिरेक करत असाल तर, तुम्हाला अल्झायमर अर्थात विस्मरणाचा आजार होण्याची शक्यता कैक पटींनी बळावते. त्यामुळे जाणून घ्या खालील माहिती आणि वेळीच सावध व्हा .
संशोधकांच्या मते वारंवार नाकात बोट घातल्याने शरीराच्या खास करुन मेंदूकडे जाणाऱ्या नसा आणि पेशींचे नुकसान होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होते व त्यांना संसर्ग होण्याचीही शक्यता असते. पुढे जाऊन हा संसर्ग वाढतो आणि संबंधित व्यक्तीला अल्झायमरसारख्या आजाराची लागण होते. यात स्मृतीभंश (Dementia) होण्याची शक्यता अधिक असते.
क्लेम सेंटर फॉर न्यूरोबायोलॉजी आणि स्टेम सेल रिसर्च सेंटरचे संशोधन प्रमुख प्रोफेसर जेम्स सेंट जॉन यांनी नुकताच एक दावा केला आहे. त्यांनी उंदरावर एक प्रयोग केला. या प्रयोगामध्ये आढळून आले की, अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नाकाच्या नसेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. तशी लक्षणे उंदरामध्ये दिसून आली. सद्यास्थितीत हा आजार उंदरांमध्ये आढळत असला तरी लवकरच त्याबाबत मानवांवरही संशोधन सुरु आहे. क्लॅमिडीया न्यूमोनिया नावाच्या बॅक्टेरिया अल्झायमरला कारणीभूत ठरतात. याच बॅक्टेरीयामुळे न्यूमोनिया आजाराचाही धोका वाढतो. हे जीवाणू नाकातील नाजूक नसांद्वारे मज्जासंस्थेपर्यंत प्रवास करतात. त्या पेशींना हटविण्यासाठी मेंदू अमिलॉएड बीटा नावाचे प्रोटीन उत्पादीत करतात. हे प्रोटिनच अल्झायमर आजार बळवण्याचे प्रमुख कारण ठरते.