
चुनाभट्टी येथील हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा ट्रस्टच्या वतीने हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा यांचा 87 वा उरुस उत्सव नुकताच मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची या दर्ग्यावर श्रद्धा आहे. त्यांच्या वतीने चादर अर्पण करण्यासाठी युवा सेनेचे राहुल कानाल, रवींद्र म्हात्रे, भास्कर महाडिक तसेच माजी नगरसेविका सान्वी तांडेल, माजी नगरसेवक विजय तांडेल, शाखाप्रमुख मानसिंग कापसे, महिला शाखा संघटिका मेघना पाचकुडे, उपशाखाप्रमुख संदीप मंत्री, शरद पाटील, बाबू म्हात्रे आदी उपस्थित होते.
हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा व त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हजरत सय्यद पीर ऐनुलाशाह बाबा आणि त्यांचे सुपुत्र सय्यद मुस्तफा जावेद आणि पणतू हजरत सय्यद एहसान जामी बाबा ही परंपरा पुढे चालवत आहेत. सर्व जातीधर्मातील लोकांना ते सतत मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत. हा उरुस उत्सव यशस्वी करण्याकरिता कमलीशाह बाबा ट्रस्टच्या सर्व कमिटी सदस्यांनी मेहनत घेतली.

























































