साखळीची चुरस आज संपणार! एच आणि जी गटातून दुसरा कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्ड कपमधील गट फेरीची चुरस उद्या (दि.2) संपणार असून, लगेच बाद फेरीचा थरार सुरू होणार आहे. ‘जी’ गटातून ब्राझील, तर ‘एच’ गटातून पोर्तुगाल हे दोन संघ लागोपाठच्या विजयासह आधीच बाद फेरी गाठून थोडे निश्चिंत झाले आहेत. मात्र, दोन्ही गटांतील उर्वरित तीन संघांना गट फेरीच्या अखेरच्या लढतीत विजय मिळवून (गोल सरासरी राखून) बाद फेरी गाठण्याची संधी असेल. त्यामुळे दोन्ही गटांतून दुसरा कोणता संघ बाद फेरी गाठणार याकडे तमाम फुटबॉलशौकिनांचे लक्ष असेल.

‘एच’ गटात शुक्रवारी दक्षिण कोरियापुढे बलाढय़ पोर्तुगालचे आव्हान असेल, तर दुसरीकडे घाना व उरुग्वे एकमेकांना भिडणार आहेत. दक्षिण कोरियाने यंदाच्या विश्वचषकात विजयाची चव चाखलेली नाही. एक पराभव व एक ड्रॉ अशी त्यांची कामगिरी आहे. त्यामुळे पोर्तुगालचा विजयरथ रोखून विजयासह बाद फेरी गाठण्यासाठी हा संघ मैदानावर जीवाचे रान करताना दिसेल.

आजच्या लढती
दक्षिण कोरिया-पोर्तुगाल : रात्री 8.30 वाजता
घाना-उरुग्वे : रात्री 8.30 वाजता
सर्बिया-स्वित्झर्लंड : मध्यरात्री 12.30 वाजता
कॅमेरून-ब्राझील : मध्यरात्री 12.30 वाजता