
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Pandey) सध्या स्टार लिस्टमध्ये समावेश आहे. अभिनयासोबत तिचा फॅशन सेन्समुळे ती नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अनन्या पांडेला ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी अनन्या पांडेच्या लूकवर जोरदार टीका होत आहे. अनन्याने ITA अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर रिव्हिलिंग रेड टॉप आणि थाय – हाय स्लीट स्कर्ट कॅरी केला होता. अनन्या पांडेचा हा ड्रेस खूपच खुलून दिसत होता आणि यादरम्यान अनन्या अतिशय धाडसी स्टाईलमध्ये तिचा बोल्ड लूक दाखवताना दिसली. अनेकवेळा अनन्या या ड्रेसमध्ये अस्वस्थ होताना दिसत होती. एवढेच नाही तर एक महिला वारंवार तिचा ड्रेस हाताळतानाही दिसली.
View this post on Instagram
अनन्याचा या लुकचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर एकीकडे, तिच्या चाहत्यांनी तिच्या ऍब्स आणि सेक्सी लूकसाठी प्रशंसा केली परंतु दुसरीकडे, या अभिनेत्रीला अवॉर्ड फंक्शनमध्ये अस्वस्थ पोशाख परिधान केल्याबद्दल ट्रोल केले गेले. काही जणांनी तर तिची उर्फी जावेदशी तुलनाही केली. अभिनेत्रीच्या या लूकवर एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट करत म्हटले की, ‘उर्फी का डिझाईन कॉपी करलिया,’ त्यावर दुसर्याने म्हटले की, ‘उर्फी फॅन लग रही है वास्तविक संघर्ष.’ दुसर्या कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, ‘ते असे कपडे का घालतात… चालायलाही इतके अस्वस्थ…’
अनन्या पांडे शेवटची विजय देवरकोंडासोबत ‘लिगर’मध्ये या चित्रपटात दिसली होती. तर आता ती ‘ड्रीम गर्ल 2’ आणि ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
























































