
>> मानसी पिंगळे
ट्रेकिंग हा रोमांचक अनुभव असतो. डोंगरमाथ्यावर चढून निसर्गाचा आनंद लुटण्यात एक विलक्षण सुखद अनुभव असतो. प्रत्येकाने जीवनात एकदातरी हा अनुभव घ्यायलाच हवा अशी सर्वोत्तम ठिकाणे आपल्या देशात आहेत. उत्तराखंडचे ब्रह्मताल हे त्यापैकीच एक.
आपला देश उंच डोंगररांगा, पर्वत-शिखरे, नद्या, बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश अशा विविध भौगोलिक परिस्थितीने समृद्ध देश आहे. हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. हिंदुस्थानात ट्रेकिंगसाठी अनेक सर्वोत्तम ठिकाणं आहेत. हिमाचलच्या पर्वतरांगांनी वेढलेले आणि बर्फाच्या चादरीने झाकलेले ब्रह्मताल. उत्तराखंडच्या चमोली जिह्यात आहे. ब्रह्मताल पाहण्यासाठी सर्वोत्तम हंगाम म्हणजे हिवाळा. ब्रह्मताल ट्रेक डोंगर-खोऱयांतून, शांत वस्त्या, नदीतून आणि ओक—फरच्या जंगलातून घेऊन जातो. अलीकडच्या वर्षांत ब्रह्मताल ट्रेक लोकप्रिय होत आहे, याचे आणखी एक कारण म्हणजे संपूर्ण बर्फाने झाकलेली झाडे आणि पर्वतांचे विहंगम दृश्य देते. ब्रह्मताल ट्रेक त्याच्या पर्वतीय दृश्यांसाठी ओळखला जातो, जेथे माउंट त्रिशूल आणि माउंट नंदा घुंटी हे ट्रेकमधील तुमचे सोबती आहेत. गोठलेले तलाव अविश्वसनीय, डोळय़ांचे पारणे फिटणारे दृश्य.
ब्रह्मताल ट्रेक लोहाजंगपासून सुरू होते. त्यामुळे ब्रह्मतालला जाण्यासाठी तुम्हाला दिल्लीहून लोहाजंग गाठावे लागेल. हे तीनप्रकारे करता येते. विमानाने दिल्लीहून डेहराडूनला फ्लाइट घेऊ शकतो. डेहराडूनहून काठगोदामला जाण्यासाठी ट्रेन पकडू शकतो किंवा तिथे गाडी चालवून जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ट्रेनने जाणे फारच सोपे आहे. दोन्ही मार्गाने बेस कॅम्पवर जाण्यासाठी काठगोदामहून लोहाजंगला टॅक्सी पकडल्याने प्रवास आणखी सोपा होता. टॅक्सी प्रवासाला साधारण आठ तास लागतात. लोहाजंगला जाण्यासाठी हा सर्वात जलद मार्ग आहे. त्याचबरोबर कार हा सुद्धा चांगला पर्याय आहे.
दिल्ली ते लोहाजंगपर्यंत कारने जाता येते. कुठेही न थांबता कार चालवल्या या प्रवासाला जवळपास 13 तास लागतात. विमानाचा वापर केल्यास सर्वात जवळचे विमानतळ डेहराडून विमानतळम आहे. ब्रह्मतालपासून एनएच 7 मार्ग 10 तासांच्या अंतरावर आहे.
हा भाग वर्षातील आठ महिने बर्फाने आच्छादित असतो. तसं पाहिलं तर हा ट्रेक दोन दिवसांत करता येतो. पण या जागेत खऱया अर्थाने जगायचं असेल तर कमीत कमी पाच दिवस तरी लागतील. अनुभवी आणि नव्याने ट्रेकिंगला जाणाऱया लोकांसाठी हा खूपच सुंदर अनुभव ठरतो.
हिवाळय़ात (डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी) हवामान सामान्यतः स्वच्छ राहते आणि सभोवतालचे विहंगम सौंदर्य अतुलनीय असते. जर तुम्हाला शून्याखालील तापमानात बर्फाच्या ट्रेकला जायचे असेल, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ ब्रह्मताल ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे.
ब्रह्मताल ट्रेक गढवाल हिमालयातील चमोली जिह्यातील लोहाजंगच्या पायथ्याशी सुरू होतो. ट्रेक पूर्ण करण्यासाठी सहा दिवस लागतात, 28 किमीपेक्षा जास्त अंतर कापले जाते. लोहाजंग ते गुजरेनी कॅम्पसाईटपर्यंतचा 6 किमीचा ट्रेक कोनिफर, देवदार, ओक आणि फरच्या घनदाट जंगलातून जातो.
ब्रह्मताल ट्रेकची कमाल उंची 12,200 फूट आहे, हा सोपा आणि मध्यम श्रेणीतला ट्रेक आहे. ब्रह्मताल ट्रेक केवळ भव्यच नाही तर अतिशय सुंदरही आहे. गोठलेले सरोवर, त्याच्या चारही बाजूंनी भव्य हिमालयाची सावली आहे. हौशी आणि अनुभवी ट्रेकर्स अशा दोघांसाठी उत्तम. पर्यटनाची आवड असणाऱयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारा आहे.


























































