शाहरुख-दीपिकाविरोधात बिहारमध्ये तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱयात सापडला आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक असल्याचे म्हणत हिंदू संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यासह पाच जणांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाणला मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रात विरोध सुरू झाला आहे. यूपीच्या मथुरेत हिंदू महासभेचा या चित्रपटाला विरोध आहे. याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.