सुनिल गावस्कर यांना मातृशोक, INDvsBAN मालिकेचे समालोचन करताना कोसळला दु:खाचा डोंगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांना मातृशोक झाला आहे. हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश मालिकेचे समालोचन करत असताना गावस्कर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

गेल्या एक वर्षापासून त्यांच्या आईची तब्येत खराब होती. यामुळे त्यांनी गेल्या आयपीएलमध्ये नॉकआऊट सामन्यांमध्ये समालोचनही केले नव्हते. आईच्या देखभाल करण्यासाठी त्यांनी घर गाठले होते.

गावस्कर यांची आई मिनल गावस्कर यांनी 95व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतच त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाची वार्ता कळताच गावस्कर मायदेशी रवाना झाले.