
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे.
दोन्ही परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाईटवरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा-महाविद्यालयातून मिळणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, असे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये
विद्यार्थ्यांनी अन्य वेबसाईट, अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही शिक्षण मंडळाने केले आहे.































































