लांजात इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक, 7 लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत 7 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरील देवधे येथे रोहित कांबळे यांच्या मालकीचे रोहित इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. या दुकानाला सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अचानक आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागल्याचे पाहताच मालक कांबळे यांना याची माहिती दिली. मात्र कांबळे हे बाहेर गावी गेले होते. ते नुकतेच परतले होते. माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते.

दुकानातील इलेक्ट्रिकल्स सामानाचे 7 लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात आधी बातमी रत्नागिरी 24 न्यूज वर. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत लांजा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.