ठसा – दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आप्पा परब… एक सामान्य गिरणी कामगार. दादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तके, दिवाळी अंक, नियतकालिके विकणारे विव्रेते. प्रख्यात नाणी संग्राहक व नाणीतज्ञ ते इतिहास संकलक-संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे, अशीच आप्पांची 83 वर्षांची आयुष्यभराची वाटचाल आहे. इतिहासावरील निष्ठsप्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाची, गडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्त्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे आप्पा परब होय. महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे, तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञान, वास्तुशास्त्र्ा, भूगोल, तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टय़ा त्यांचे महत्त्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. ‘जे किल्ले मावळय़ांनी तानाजी, बाजी, येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी मला पैशांची गरज नाही.’ हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्याबरहुकूम ते वागत आले. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या यशोगाथा, त्यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढीला योग्य रीतीने समजावे, प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळय़ांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा, यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरपह्ड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला, प्रचंड तप केले, कठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह-तारे बोलतात या तत्त्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाङ्मयातील प्रज्ञा, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जाऊन केलेले प्रत्यक्ष प्रयत्न आणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते. नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन, आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवून गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटपंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोहिनूर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. एका दृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे ‘सिद्धऋषी’ म्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आप्पा परब हे तसे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकीर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत 40 हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे. तरीही शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने थकलेला नाही हे प्रतीत होते. सह्याद्रीच्या कडय़ाकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी स्वतः मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशाप्रकारचे लेखन आवडणारही नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वपेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचे, इतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमींच्या मनात आहे. आजच्या या तत्त्वे, चारित्र्य, सत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळहातावरच्या पह्डाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, परंतु केवळ त्यांचे व्यक्तिमाहात्म्य न वाढवता तत्त्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल ‘चतुरंग’ने घेतली. ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

>> रवींद्र मालुसरे

– अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई

([email protected])