
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 7 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. त्यांना मनी लाँडरिंगप्रकरणी 23 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. ईडीला अर्पिता यांच्या घरामध्ये मोठय़ा प्रमाणात रोकड सापडली होती.



























































