झारखंडमध्ये स्फोट; 4 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडच्या धनबाद येथे रविवारी दुपारी बाजारपेठेत झालेल्या स्फोटात चार ठार तर 5 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर धनबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिकीमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.