
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात महिला गटात धाराशीवने ठाण्याचा, तर मुंबई उपनगरने पुण्याचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पुरुष गटात मुंबई उपनगरने पुण्याचा 1 गुण व 0.50 मिनिटे राखून (17-16) पराभव केला. वेगवान आक्रमण, शांतपणे केलेले संरक्षणामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. विजयी संघातर्फे अनिकेत पोटे, ओमकार सोनवणे, निहार दुबळे, ऋषिकेश मुरचावडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. या स्पर्धेत महिला गटात धाराशीवने ठाण्याचा एक गुणाने रोमहर्षक पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात धाराशीवच्या अश्विनी शिंदे, संपदा मोरे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत विजयात मोलाचा वाटा उचलला.



























































