जीवनशैलीला हवी मर्यादा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आई-बाबांनी दिलेल्या पॉकेट मनीवरच आपल्या हौशी मौजी अवलंबून असायच्या. मर्यादित बजेटमुळे हात आखडता घ्यावा लागायचा. ज्या क्षणी कमवायला सुरु केले त्या क्षणी अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांवर खर्च करायला सुरुवात झाली. खर्च करण्याआधी बचत करा हे समीकरण बाजूला सारून उच्च जीवनशैली उपभोगण्याकडे कल वाढू लागला. कालांतराने आपल्या पात्रतेपेक्षा मोठी जीवनशैली आकर्षित करू लागली. त्यामुळे हळूहळू कर्जाच्या चक्रात अनेकांची मानसिक शांतता भंग पावली. सुरुवातीलाच झालेल्या संस्कारामुळे पुढील आर्थिक नियोजनही धोक्यात येऊ लागले.

अगदी 10 हजार मासिक पगार असलेली व्यक्ती जेव्हा एक लाखाचा आय पह्न कर्जावर घेते तेव्हा ही व्यक्ती आपल्या भविष्यासाठी काय तरतूद करणार? एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी ती गोष्ट आपल्या उत्पन्नाला सूट होणार का, हे तपासून पाहणे खूप गरजेचे आहे. आजकालच्या भौतिक जगात आपण स्वतःला शिस्तबद्ध नाही ठेवले तर मात्र कर्जाच्या बोज्याखाली आपण दबून जाऊ व आयुष्यभर आपणास काम करावे लागेल. त्यासाठी कमावलेल्या उत्पन्नापैकी 30 ते 40 भाग आपल्या लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवला पाहिजे. कर्जाचा हप्ता 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. आपली जीवनशैली कमावलेल्या उत्पनापेक्षा 30  ते 40 टक्के पेक्षा जास्त न ठेवता आपल्याला जीवनशैलीची मर्यादा घालून घेणे आवश्यक आहे. आपले काwशल्य वाढवून अधिक उत्पन्न मिळविण्याकडे आपला कल असायला हवा. आपण जीवनशैलीच्या मर्यादा आखल्या तर नक्कीच भविष्यात आपल्या उद्दिष्टांसाठी संपत्ती जमा करू शकतो व निश्चिंत राहू शकतो.

 – चंद्रहास रहाटे, (लेखक आर्थिक सल्लागार आहेत.) 

कमावलेल्या उत्पन्नापैकी 30 ते 40 भाग आपल्या कमी व लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवता आला पाहिजे. आपण स्वत:च्या जीवनशैलीला मर्यादा घातल्या तर नक्कीच भविष्यात निश्चिंत राहू शकतो.