
मध्य प्रदेशातील सॉफ्टग्रीड कम्प्युटर या आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांनी वेळेत घरी जाण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. एका व्हायरल लिंक्डइन पोस्टनुसार कंपनीत नऊ तास पूर्ण झाल्यानंतर वेळेच्या पुढे काम केल्यास त्यांचे संगणक आपोआप बंद होतात. कंपनीच्या या अनोख्या कृतीचे सगळीकडे कौतुक होत आहे.
मध्यप्रदेशातील इंदूरमधील सॉफ्टग्रीड कम्प्युटर नावाची कंपनी आहे. कंपनीच्या एका कर्मचारी असलेल्या महिलेने डेस्कवर बसलेला स्वतःचा फोटो शेअर केला, तिच्या संगणकाच्या स्क्रीनवर एक ‘वॉर्निंग’ मेसेज दिसत आहे. त्यात तुमची शिफ्ट संपली आहे. कार्यालयातील यंत्रणा 10 मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा असा मेसेज येतो. पोस्टनुसार, कंपनी कामाच्या वेळेत कोणतेही फोन कॉल आणि ईमेल नसतील. कंपनीच्या इच्छा आहे की, कंपनीतील कर्मचारी कायम खुश राहावेत आणि त्यांच्या येथील वर्ककल्चर चांगले राहावे. या स्क्रिनशॉटवर बऱ्याच प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. युजर्संना ही नेमकी कोणती कंपनी आहे, जी एवढ्या सुविधा देते असा प्रश्न पडला आहे. तर असे काम केल्याने कर्मचाऱ्यांना आनंद होईल, असे अनेकांनी सांगितले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार डेक्सटॉप किंवा लॅपटॉप बंद झाल्याने वेळ पूर्ण करण्यासाठी दबाव राहिल. एका युजरने लिहीलेय, मला येथे काम करायला आवडेल. अधिक कार्यक्षम आणि उत्पादनक्षम.
दुसर्या युजरने लिहिलेय, जेव्हा असे घडते, तेव्हा संध्याकाळी 7 नंतर मिटींगना उपस्थित राहण्यापेक्षा हे चांगले आहे. कर्मचारी वेळेत घरी जाऊन विश्रांती घेतील. तिसऱ्या युजरने लिहिले, हे केवळ तांत्रिक नसलेल्या लोकांसाठीच काम करेल. दुसऱ्या युजरने लिहिले, काहींसाठी हा आनंदाचा स्रोत असेल, परंतु इतरांसाठी अत्यंत तणावाचा स्रोत असू शकतो. मी कल्पना करू शकतो की, मला बऱ्याच मिटिंग्सनंतर काम करावे लागेल आणि नंतर मला महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत. कारण माझा लॅपटॉप बंद होण्याचे प्रेशर असेल अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

























































