
(फोटो सौजन्य – चंद्रकांत पालकर, पुणे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कसबा पेठ मतदारसंघात जाहीर सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी गद्दारांना हिंमत असेल तर निवडणुका लावा, असे जाहीर आव्हान पुन्हा एकदा दिले आहे.
सध्याची राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. अंत्यत गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्यामुळे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लढत आहोत. त्यामुळे ही फक्त निवडणूक नसून ही लोकशाही आणि संविधान रक्षणाची लढाई आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणले.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- अफवा, पसरवणे, खोक्यांचे राजकारण, द्वेषाचे राजकारण याला बळी पडून नका.
- हा लोकशाही आणि संविधानासाठी लढाई आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आम्हाला आमदार हवे आहेत.
- माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत मला आदर आहे. मात्र, आमच्या महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही
- जे महाराष्ट्राला संपवण्याचे, झुकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते करत असलेल्या भाजपसोबत तुम्ही जाणार का
- सलीम अली पार्क प्रस्तावित असलेल्या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड झाले आहे.
- त्यानंतर ठाण्यातून लढण्याचे आव्हान दिले. मात्र आता ठाणे हे शिवसेनेचे आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत.
- आम्ही वरळीतून लढण्याचे आव्हान दिले. तिथे घाबरले. बदनामीसाठी यंत्रणा मागे लावली.
- गद्दारी करण्यासाठी सूरत, गुवाहाटी गोवा असे ते पळाले. ते घाबरट आहेत. हेच दिसून येते.
- आपण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना अनेकदा आव्हान देत आहोत, ते घाबरतात,
- हिंमत असेल तर निवडणूक घ्या, जनता त्यांचा कौल देईल.
- आपल्याकडे गद्दारी करत ते खुर्चीवर बसले. जनतेचा कौल घेतला नाही.
- ज्यावेळी निवडणुका लागतील, त्यावेळी गद्दार गँग साफ होईल.
- महापालिका, नगरपालिका कोणत्याही निवडणुका लावायला तयार नाही.
- आताची परिस्थिती पाहता, लोकशाहीच धोक्यात असल्याचे दिसते.
- आता आपण 90 हजार कोटींच्या फायद्यात तेही नवा कर न लावता.
- मुंबई पालिकेत आम्ही सत्तेत आलो, तेव्हा पालिका 600 कोटीच्या तोट्यात होती.
- जनतेच्या पैशांचा हिशोब त्यांना मिळायलाच हवा.
- मुंबई महापालिकेला ऑडीट लावा, तसेच ठाणे, कल्याण, नागपूर आणि पुणे महापालिकेतही लावा.
- अशा परिस्थितीत तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहात, की गद्दार गँगसोबत आहोत.
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते, हे चिंताजनक आहे.
- महाराष्ट्राला भेटायचे कोणाला सीएम की सुपर सीएम असा प्रश्न आहे.
- या सर्व घडामोडी पाहता, आमदार निवडताना तुम्ही काळजीपूर्वक निवड करायला हवी.
- तुम्ही खर्च कसा केला ते दाखवा. तेथे कोणाला भेटले ते शेड्यूलही दाखवत नाही. नेमके तिथे काय केले.
- मुख्यमंत्री दावोसला गेले, 28 तासात त्यांनी 40 खोके खर्च केले.
- गुजरातला गेले म्हणून राग नाही, मात्र आमच्या हक्काचे दुसऱ्या राज्यात जात आहेत.
- जे आम्ही बोलत होतो, ते करत होतो, गाजर वाटप आम्ही कधीही केले नाही.
- महाविकास आघाडी सरकारने पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतला होता.
- त्यांच्यात गाजर वाटपाचा कार्यक्रम जोरात सुरू आहे.
- ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे, तर ते म्हणातात दिल्ली सांगेल तिथे मी मुख्यमंत्री
- गद्दारांच्या काळात राज्यात येणारे प्रकल्प त्यांनी गुजरात आणि राज्याबाहेर पाठवले.
- कोविडच्या काळात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाविकास आघाडीने आणली होती.
- शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला शेती करावी असे वाटत नाही.
- राज्यात एकही शेतकरी समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे.
- समाजातला एकही घटक समाधानी नाही. गद्दारांचे सरकार कोणालाही आपले वाटत नाही.
- दिल्ली आक्रमण करत आपल्यावर येत आहे. त्यांच्यासोबत गद्दार आहे.
- पुण्यात येणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प त्यांनी गुजरातला पाठवला.
- आमच्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विकास होत होता.
- राज्याचे प्रत्येक क्षेत्र मागे पडत आहे.
- महाविकास आघाडीचे सरकार का पाडले, आमचे काय चुकले होते.
- आपल्या देशात आजही सत्यमेव जयते ला महत्त्व आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत.
- संविधानाच्या बाजूने लढणार की, लोकशाही संपवायला निघालेल्यांच्या मागे उभे राहणार हे तुम्हालाच ठरवायचे आहे.
- आता तुम्ही कोणाच्या बाजूने लढणार हे तुम्हाला ठरवायचे आहे.
- त्यामुळे ही फक्त निवडणूक राहिली नसून देशाला दिशा देणारी घटना ठरली आहे.
- हे सर्व हूकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. हे वातावरण भयानक आहे.
- आमच्या विरोधात बोलतात, तर आत टाकू ही दहशत निर्माण करण्यात येत आहे.
- विरोधकच नाही तर सामान्य माणासांनाही नोटीस पाठवत आहे.
- भाजपविरोधात बोलल्यावर विविध यंत्रणा नोटीस पाठवतात. त्यानंतर चोकशीचा ससेमिरा मागे लागतो.
- देशाला दिशा देणारी ही निवडणूक आहे.
- पुण्यात आपण प्रेरणा आणि जोश घेण्यासाठी आलो आहे.
- कोणतेही बंड हे पुण्यातून होते. पुण्याशी आपलाही संबंध आहे.
- फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आणि जगाचेही लक्ष या निवडणुकीकडे आहे.
- 40 गद्दारांनी शिवसेना, महाविकास आघाडी आणि जनतेशी गद्दारी केली आहे.
- ते चोर आहेत, आणि चोर असाच त्यांचा उल्लेख होणार, ते गद्दार आहेत.
- आपल्या पक्षाचे नाव चोरले, पक्षाचे नाव चोरले, पण तुमच्या माथ्यावर गद्दार असा शिक्का आहे.
- अंत्यत गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे.
- 32 वर्षांचा तरुण गद्दारांशी एकटा लढत आहे, असे तुम्ही म्हणता पण माझ्या पाठिशी जनता आहे.
- रवींद्र धंगेकर यांना विधआनसभेत आणायचे आहे, आता तुम्ही तुमचे काम करा.
- हा रोड शो होत असताना 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा येत होत्या.
- निवडणूक चिन्ह काँग्रेसचा म्हणजे सिंघमचा पंजा आहे.
- आता निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे. विजय आपलाच आहे.
- प्रचारसभेसाठी येताना विजयसभेसाठी आल्याचे वाटत आहे.
- हा उत्साह बघितल्यानंतर ही प्रचारसभा नसून विजयसभा असल्याचे वाटत आहे.
- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
































































