Germany Church shooting जर्मनीतील चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबारात 7 ठार, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर्मनीमधील एका चर्चमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्ल्यामागील कारण अस्पष्ट आहे.

जर्मनीमधील हॅम्बर्ग शहरातील एका चर्चमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार सुरू होता. चर्चच्या वरच्या भागामध्ये एक मृतदेह सापडला आहे. हल्ल्यानंतर या भागातून एकही व्यक्ती फरार झाल्याचे दिसून न आल्याने चर्चमध्ये सापडलेला मृतदेह हल्लेखोराचा असा अशी शंका पोलिसांना आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कसून तपास केला जात आहे. तसेच हॅम्बर्गच्या महापौरांनी या हल्ल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. मी पीडितांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोलिस पूर्ण ताकदीने काम करत आहेत, असे ट्विट महापौर पीटर चॅन्चर यांनी केले.