‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ या मालिकेतील ‘खोपडी’ या व्यक्तिरेखेद्वारे घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे आज निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. समीर खक्कर यांचा मुलगा गणेश खक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी समीर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर बेशुद्ध पडले.

डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समीर यांनी ‘सर्कस’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘मनोरंजन’, ‘नया नुक्कड’, ‘अदालत’, ‘संजीवनी’ या मालिकांसह ‘जवाब हम देंगे’, ‘मेरा शिकार’, ‘शहंशाह’, ‘गुरू’, ‘नफरत की आंधी’, ‘परिंदा’, ‘शहजादे’, ‘वर्दी’, ‘जय हो’ आदी  चित्रपटांतही भूमिका साकारल्या होत्या.