
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव सहकार सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी शिल्पा सरपोतदार यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश शिरवाडकर, संदीप तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी रंजना नेवाळकर, प्रदीप खोपडे, वालेंद्र पोतदार, किशोर देशमुख, अनिल कदम, चंद्रशेखर वायंगणकर यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. खजिनदारपदी बाळासाहेब शिंत्रे, सहखजिनदारपदी संदीप माडय़े यांच्या तर सचिवपदी अशोक वंडेकर, चंद्रकांत नेवरेकर, सुरेश मोहिते, विलास पातेरे, अतुल म्हैसणे, दत्ताजी गायकवाड, नितेश जगताप, सीमा राऊत, नीळपंठ तायडे यांची नियुक्ती केली आहे. कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. राजस राणे, विजय चपटे, प्रकाश चांदिवडे, वनिता देशमुख, संजीव शिरोडकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
सुवर्णा करंजे कांजूर-भांडूप (पूर्व) रिक्षाचालक-चालक सेना अध्यक्ष
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कांजूर- भांडूप (पूर्व) रिक्षा चालक-मालक सेनेच्या अध्यक्षपदी सुवर्णा करंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरची नियुक्ती केल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.


























































