प्लेलिस्ट – फ्लॅशबॅक आणि गाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हर्षवर्धन दातार << [email protected] >>

फ्लॅशबॅक अर्थात पूर्वदृश्य असलेल्या गाण्यांच्या विषयावरील पहिल्या भागात समावेश असलेल बहुतेक गाणी ही कृष्ण-धवल काळातल होती. काही चित्रपटांचे कथानक तर फ्लॅशबॅकपासूनच सुरू होते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच सुरेख सांगड घातलेली या गाण्यातून दिसते.

ऋषितुल्य दिग्दर्शक हृषकेश मुखर्जींचा आशर्वाद (1968). सुमिता सन्यालवर चित्रित ‘एक था बचपन’ हे गुलजार लिखित आणि लताजींनी गायलेले अतिशय हृदयस्पर्शी गाणे. जोगी ठाकूर (अशोक कुमार ) ची मुलगी नीना ( म्हणजेच लहानपणच बिट्टू) ला लहानपण वडिलांबरोबरचे प्रसंग आठवतात व ते पूर्वदृश्याच्या रूपात गाण्याच्या मध्ये आपल्याला दिसतात. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता या चित्रपटाला. अशोक कुमार ‘रेल गाडी’ हे या चित्रपटातले गाजलेले गाणे. मौसम (1975). चित्रकर्मी गुलजार यांचा एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट. संजीवकुमार व शर्मिला टागोर यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला आणि काहीसा अस्वस्थ करणारा चित्रपट. ‘दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ हे गाणे दोन प्रतिरूपात आहे. एक भूपिंदर-लताचे युगल गत आणि दुसरे भूपिंदरचे नामावलीत येणारं संथ सुरातलं. युगल गीतात फ्लॅशबॅक तंत्राचा उत्कृष्ट उपयोग गुलजारनी केला आहे.
डॉक्टर अमरनाथ (संजीव कुमार) अनेक वर्षांनी आपल्या तरुणपणच्या प्रेमाला, चंदाच्या शोधात दार्जिलिंगला येतात आणि त्या आठवणत रमतात. शब्दातून गुलजार आपल्याला निवांत क्षणांची आठवण करून देतात. चित्रकरणात भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच सुरेख सांगड आपल्याला दिसते.

दुसरा आदमी (1977). तरुणपणी आपल्या भावी जोडीदाराला (शशी कपूर) गमावून बसलेली निशा (राखी). तिच्या आयुष्यात करण (ऋषी कपूर) येतो आणि निशाला आपलं पूर्वायुष्य परत आल्याची जाणीव होते. मजरुह लिखित ‘क्या मौसम है’ या गाण्यात निशाला करणमध्ये शशीचा भास होतो. निशा क्षणभर सुखावते. मात्र लगेचच भानावर येते आणि तिला वास्तवाची जाणव होते. सतार, संतूर, बॉन्गो आणि शीळ या वाद्यमेळाचा सुंदर उपयोग केला आहे संगीतकार राजेश रोशननी. निर्णायक क्षणी रफी साहेब गाण्यात एंट्री घेतात आणि गाण्याचा मूड बदलतो. राजेश रोशननी एका मुलाखतत सांगितले होते की गाण्याची चाल केवळ एकदा ऐकून रफीजींनी आपला भाग एका टेकमध्ये गायला होता. बसेरा (1981). अपघाताने डोक्यावर परिणाम झाल्याने बलराज (शशी कपूर) ची मनोरुग्ण पत्नी शारदा (राखी) ही वेडय़ांच्या इस्पितळात असते. मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून शारदाची बहीण निमा (रेखा) ही बलराजची दुसरी पत्नी म्हणून घरात येते. पुढे शारदा बरी झाल्यानंतर घरी येते आणि पुढचे नाटय़ घडते. ‘जहाँ पे सवेरा हो, बसेरा वही है’ या फ्लॅशबॅक गाण्याबरोबर बलराजला शारदा आणि आपल्या लहान मुलाबरोबरचे जुने दिवस आठवतात. गाण्याच्या शेवटी गुलजार आपल्याला जाणीव करून देतात की, खऱ्या अर्थाने ‘जहाँ पे बसेरा हो, सवेरा वही पे है’ जिथे घर तिथे एक नवीन सुरुवात. जिथे दया, सहानुभूत, अनुकंपा आहे तिथे आशा आहे. पंचमदांचे संगत आणि लताजींचे तार सप्तकातले सूर यांनी ऑर्गनच्या सुरांन सुरुवात असलेल्या या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

काही चित्रपटांचे शेवट आपल्याला अस्वस्थ करतात, हेलावून सोडतात. मौसम, बसेरा असे काही चित्रपट. खामोश (1969) याच श्रेणीतील एक नितांतसुंदर कलाकृती. राधा (वहिदा रेहमान) ही मनोरुग्णाच्या इस्पितळात नर्स असते आणि तिच्या देखरेखखाल असलेल्या देव (धर्मेंद्र)मध्ये भावनिकरीत्या गुंतलेल असते. देव बरा होतो आणि आपल्या आयुष्यात पुढे निघून जातो. पुढे प्रेमभंगामुळे डोक्यावर परिणाम झालेला अरुण (राजेश खन्ना) उपचाराकरिता त्याच इस्पितळात येतो आणि पुन्हा एकदा राधा त्याच्यात गुंतते. अरुण बरा होतो, मात्र आपले व्यावसायिक कर्तव्य आणि व्यक्तिगत भावना या वेगळ्या न ठेवता आल्यामुळे शेवटी राधाच्या डोक्यावर परिणाम होतो. चित्रपटात शेवटी ‘वो शाम कुछ अजब थी’ या गाण्यात वहिदा रहेमानच्या नजरेसमोर गुंतलेल्या आठवणींची पूर्वदृश्ये येतात.

चितचोर (1976). बासू चॅटर्जीचा मोजके कलाकार आणि सरळ सोपी कथा असलेला कौटुंबिक मनमिळाऊ चित्रपट. विनोद, सुनील, गीता आणि छोटा राजू जे पिकनिकला जाताना ‘आज से पहले आज से ज्यादा’ हे गाणे पडद्यावर येते. खुशीत असलेल्या विनोदला गीताबरोबरचे गाणे शिकवितानाचे प्रसंग आठवतात आणि जे आपल्याला पडद्यावर दिसतात. अकॉर्डिअन, व्हायोलिन, गिटार आणि ड्रम्सच्या साथने गाणे सुरू होते. सुरुवातीचं सुंदर वाहतं संगीत एकूणच आनंदाचा, पिकनिकचा ‘मूड’ तयार करतं. वाहते संगीत संयोजन आणि विशेष म्हणजे विनोदला सत्य परिस्थिती उमगते आणि तो थोडासा उदास होतो. म्हणून शेवटच्या कडव्यात मूड बदलतो, गंभीर होतो.

संगम (1964). प्रेमाची  त्रिकोण कथा. राज कपूर राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला तसेच शंकर -जयकिशनच्या अप्रतिम संगीताने नटलेला  गाजलेला चित्रपट. कथेच्या एका नाजूक वळणावर ‘दोस्त दोस्त न राहा’ हे मुकेशचे गाणे पडद्यावर येते. गाणे राज कपूरवर चित्रित असले तरी राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला यांच पूर्वदृश्ये आपल्याला दिसतात. हे गाणे म्हणजे शंकर जयकिशन व प्रसिद्ध अरेंजर सेबास्टियन डिसोझांच्या विस्तृत संगीत संयोजनाचा एक अद्भुत आविष्कार आहे. आपकी कसम (1975) या चित्रपटाचा. कमल (राजेश खन्ना) सुनीतावर, आपल्या बायकोवर संशय घेतो आणि त्या वणव्यात स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. शेवटी पश्चातापदग्ध आणि असहाय कमल निरुद्देश वणवण भटकतो. कधी रेल्वेत तर कधी पायी. तेव्हा ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम’ हे गाणे पडद्यावर येते. आनंद बक्षीचे  जीवनाचे, विश्वासाचे अर्थपूर्ण तत्त्वज्ञान, पंचमदांच्या संगतावर आणि किशोर कुमारनी गायलेले व अतिशय कल्पकतेने चित्रित केलेक्या या गाण्यात कमलला आपले जुने दिवस आठवतात व जे आपल्याला पडद्यावर दिसतात.

दोस्त (1974) हा धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हाचा चित्रपट. सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांत त्या वेळच्या गरिबी, बेरोजगारी या दैनंदिन परिस्थितचे दर्शन होत असे. अनाथ मानव हा नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचा पुरस्कर्ता असतो आणि त्याच्या या प्रयत्नात मित्र गोपी त्याला साथ देतो. ‘गाडी बुला रही है’ हे प्रेरणापद गीत चित्रपटाच्या नामावलीत आणि नंतर अनेकदा येते. गाण्याच्या दरम्यान मानवचे नोकरी मिळविण्याचे प्रयत्न आपल्याला पूर्वदृश्याच्या माध्यमातून दिसतात. रेल्वे गाडीच्या माध्यमातून आनंद बक्षींचे जीवनदर्शन शब्द, चर्चची घंटा, हार्मोनिका, ब्रास सेक्शन असा विस्तृत वाद्यमेळ असलेले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगत आणि किशोर कुमारच्या भव्य गायकीने हे गाणे खूप लोकप्रिय बनविले.

छोटीसी बात (1976). बासू चॅटर्जीची आणखी एक हलकीफुलकी मनोरंजक प्रस्तुती. योगेश-सलील चौधरी – लताजी ‘ना जाने क्यू’ गाण्यातून प्रभाचे (विद्या सिन्हा) अरुण (अमोल पालेकर) बद्दलचे विचार आणि गमतीदार आठवणी व्यक्त होत असतात. पार्श्वभूमीला त्याकाळचे मुंबईतील तुरळक रहदारी असलेले रस्ते, बेस्ट बसेस, जमर चित्रपटाचे पोस्टर यातून बासूदांनी आठवणींचा हिंदोळा आपल्यासमोर ठेवला आहे. बासू चॅटर्जींचाच रजनीगंधा (1974) चित्रपटातील ‘कयी बार यूही देखा है’ हे योगेश-सलील चौधरी – मुकेशन गायलेले सुंदर गाणे.  यात दीपाच्या (विद्या सिन्हा) मनातले संजय (अमोल पालेकर) की  नवीन (दिनेश ठाकूर) हे द्वंद्व दिसते. नेहमप्रमाणे बासुदांच्या चित्रपटात आपल्याला होते मुंबईची सैर. आपल्या चित्रपटात फ्लॅशबॅक किंवा अतितावलोकन पूर्वदृश्यचा वापर सढळपणे केला गेला असला तरी गाण्यात त्याचा वापर जरा कमी दिसतो.

 (लेखक संगीत अभ्यासक आहेत)