स्टार्टअप वाढले, बेरोजगारी घटेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार्टअप इंडियाची सुरुवात सात वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 86 हजार 713 स्टार्टअपला मान्यता मिळाली आहे. त्यातून 9 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. असे असले तरी देशाची बेरोजगारीचा दर जेमतेम एक टक्का घटला आहे. जानेवारी 2016 मध्ये बेरोजगारीचा दर 8.7 टक्के होता, जो मार्च 2023 मध्ये 7.8 टक्के झाला.

महाराष्ट्रात सर्वात जास्त 15 हजार 571 स्टार्टअप सुरू करण्यात आले. त्यातून गेल्या तीन वर्षांत 1.18 लाख जणांना रोजगार मिळाला. तरीही मागील सात वर्षांत महाराष्ट्रात बेरोजगारी दर वाढला आहे. जानेवारी 2016 मध्ये बेरोजगारी दर 4.6 टक्के होता, तो मार्च 2023 मध्ये 5.5 टक्के झाला.

30 डिसेंबर 2022 पर्यंत एकूण 56 क्षेत्रांमध्ये 86 हजार 713 स्टार्टअपला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक 10 हजार 419 स्टार्टअप आहेत. त्याखालोखाल हेल्थ केअरमध्ये 8088 स्टार्टअप, शिक्षण क्षेत्रात 5650, कृषी क्षेत्रात 4266 आणि खाद्यपेय इंडस्ट्रीत 4181 स्टार्टअप सुरू झाले आहेत. सर्वात जास्त स्टार्टअप 2022 साली सुरू झाले आहेत. त्याआधी कोरोना काळात म्हणजे 2021 आणि 2020 या दोन वर्षांत 34 हजार 601 स्टार्टअपला मंजुरी मिळाली आहे.

देशात सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सुरू झाले आहेत.