वीज दरवाढीवरून शिवसेना आक्रमक; निवेदनाद्वारे दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भर उन्हाळ्यात राज्यभरामध्ये विजेची दर वाढीवरून आणखीनच तापलं आहे. सर्वसामान्य जनतेला या दर वाढीची थेट झळ बसणार असून मोठे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून नगरमध्ये विजेचे विविध प्रश्न घेऊन येथील कार्यकारी अभियंता युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या नेतृत्त्वात कार्यकारी अभियंत्याना निवेदन देऊन विजेची दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान जर दरवाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईल आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने नगर शहराचे जिल्ह्याला वीजपुरवठा करण्यात येतो. आज अनेक भागांमध्ये परस्परित्या विजेचा खेळ खंडोबा झाल्याचे पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये कमी व उच्च दाब वीज मिळत असल्यामुळे तेथे सुद्धा उद्योजकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे त्या नागरिकांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही एवढीच एक भाग वाचताना दुसरीकडे नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर सुद्धा वेळोवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आजही नगर शहराला वर्षातून शंभर दिवस पाणी मिळू शकत नाही ही सुद्धा परिस्थिती पाहिल्यावर विजेचा खेळखंडवा झाला आहे असे म्हणावे लागेल तर दुसरीकडे आता सर्वसामान्यांना विजेचा मोठा फटका बसलेला आहे. जे नेहमीचे बिल आहे यामध्ये सुमारे 17 टक्क्याने वाढ करण्यात आलेली आहे, ही अतिशय भयावक परिस्थितीची वाढ असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका आता बसू लागलेला आहे.

वीज ग्राहकांना शॉक

राज्यात एककीडे उन्हाचा पारा वाढत असताना राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात भरमसाठ वाढ करून जनतेला ऐन उन्हाळ्यात शॉक दिला आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा आणि अदानी पॉवर या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात वाढ केली आहे. या तीन कंपन्यांपाठोपाठ उर्वरित महाराष्ट्राला वीज पुरवणारी महावितरण या कंपनीने देखील वीज दरवाढ करण्याच्या निर्णय घेऊन ग्राहकांना झटका दिला आहे. वीज दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना तसेच छोट्या आणि मोठ्या उद्योगांना बसणार आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या राज्यातील जनतेसाठी ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना….. अशीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, गौरव ढोणे, संजय सायगावकर, जालू वाघ श्रीकांत चेमटे अरुण झेंडे रमेश खेडकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.