
शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात आलेल्या अवकाळी पावसाने शनिशिंगणापूर परिसरात हाहाकार माजविला. मुळा कारखान्याच्या बगॅसवर वीज पडून बगॅसला भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी राहुरी, नगर, गंगामाई, ज्ञानेश्वर, शनिशिंगणापूर, पाथर्डी आदी ठिकाणांहून अग्निशमन बंब मागविण्यात आले. या घटनेत जीवितहानी टळली असून, कारखान्याची यंत्रसामग्रीही बचावली आहे. रात्री उशिरा आग आटोक्यात आल्याची माहिती मुळा कारखान्याचे सुरक्षा अधिकारी राजू जायगुडे यांनी दिली.



























































