
माहीममध्ये समुद्रात पोहायला गेलेल्या 12 वर्षांचा मुलाचा बुडून मृत्यू झाला. पोहण्याच्या नादात खोल समुद्रात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. शाळांना पडलेल्या सुट्टय़ांमुळे मुलांमध्ये मोठय़ा उत्साहाचे वातावरण आहे. मात्र उत्साहाच्या भरात मुलांकडून झालेल्या चुकांमुळे जीव धोक्यात येतो. माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात आज संध्याकाळी 5.30 च्या सुमाराला काही मुले समुद्रात पोहोयला गेली, मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने रेहान मंडल (12) हा बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढत शीव रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.



























































