
एकीकडे देशात नोकरीच्या प्रश्नाने तरुण चिंतेत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. दुसरीकडे असे होते की, इच्छा नसताना नोकरी करावी लागते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी अनेकांना मनाविरुद्ध नोकरी करावी लागते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लोकांना नोकरीत समाधान- शांती कमी मिळते. अशा सगळ्या परिस्थितीत सोशल मिडीयावर एका व्यक्तीचा राजीनामा व्हायरल होत आहे. हा राजीनामा फक्त एका ओळीचा आहे.
’डिअर सर, मी राजीनामा देतोय, कामात मज्जा येत नाही, तुमचा राजेश’… बस्स, एवढाच मजकूर लिहून व्यक्तीने राजीनामा दिला आहे. हे राजीनामापत्र इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हे पत्र जुने असल्याचे समजते. आतापर्यंत त्याला हजारो लोकांनी लाईक्स करून कमेंट केली आहे. थेट आणि स्पष्ट राजीनाम लिहिणार्या व्यक्तीचे कौतुकही होत आहे.






























































