
राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. सिंह यांच्यावरील सर्व आरोप तसेच त्यांचे निलंबनही मागे घेण्यात आले आहे. बरोबरच त्यांचा निलंबन कालावधी हा ऑन डय़ुटी मानला जावा असेही सरकारी आदेशात म्हटले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्या आरोपावरून अनिल देशमुख यांना तुरुंगवास झाला होता. तसेच परमबीर यांच्यावरही अनेक आरोप झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. ऑण्टिलिया बॉम्ब अफवा प्रकरणात त्यांना आयुक्तपद गमवावे लागले होते. परमबीर सिंह यांच्यावरील या आरोपांची चौकशी करणाऱया पेंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोंदवले होते.
परमबीर यांच्यावर 2 डिसेंबर 2021 रोजी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. आज ते मागे घेऊन हे प्रकरणच बंद करण्यात आले. शासनाचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी या आदेश जारी केला.





























































