आमची फक्त 0.4 टक्के मते कमी झाली आहेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात कुठलंच सरकार पुन्हा येत नाही. एखादा अपवाद सोडला तर तेथे दर पाच वर्षांनी सरकार बदलत असतं. यावेळी आम्ही ही परंपरा तोडू असं वाटलं होतं, पण तसं करू शकलो नाही. 2018 मध्ये आमच्या 106 जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला 36 टक्के मतं होती. आता आम्हाला 35.6 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी म्हणजे 0.4 टक्के मतं कमी झालीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.