घरफोडीच्या तपासात 10 गुन्ह्यांची झाली पोलखोल, भुईंज पोलिसांच्या तपासाची सर्वत्र होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक प्रश्न सोडविताना दुसरा सुटावा, पाठोपाठ तिसरा-चौथाही प्रश्न सुटावा, असा गमतीशीर, परंतु पोलीस दलाची मान उंचवावी असा अनुभव नुकताच आला. एका घरफोडीच्या गुह्याचा तपास करताना भुईंज पोलिसांना घरफोडीचे दोन, तर मोटारसायकलचोरीचे आठ असे तब्बल 10 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. याप्रकरणी एकूण सहा लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाई तालुक्यातील उडतारे येथे 24 फेब्रुवारी रोजी शुभांगी संजय साबळे (कय 40) यांच्या शेतातील घरात चोरी झाली होती. चोरटय़ाने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान हा गुन्हा गावातील योगेश संदीप बाबर (वय 19) या गुन्हेगाराने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भुईंज पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले दागिने त्याचा मामा रमेश दिनकर दुदुस्कर (वय 40, रा. सोनगाव, ता. जावली, जि. सातारा) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी मामालाही अटक केली.

दोघांकडे चौकशी करीत असताना भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एक घरफोडीचा गुन्हा, तसेच भुईंज पोलीस ठाण्यातील दोन, काई व शिरवळ पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी एक असे मोटारसायकलचोरीचे चार गुन्हे उघड झाले आहेत. गुह्यांतील अटक झालेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता, त्यांनी मेढा, तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकीचोरी करणाऱया आरोपींबाबत माहिती दिल्याने त्या परिसरातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांनी सातारा तालुका व मेढा पोलीस ठाण्यांकडील प्रत्येकी दोन अशा चार दुचाकीचोरीच्या गुह्यांची कबुली दिली. पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या.

अशा प्रकारे घरफोडी, चोरीचे दोन गुन्हे उघड करून दोन लाख 30 हजार रुपये किमतीचे चार तोळे पाच ग्रॅम कजनाचे सोन्याचे दागिने क 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, तसेच दुचाकीचोरीचे आठ गुन्हे उघड करून चार लाख रुपये किमतीच्या आठ चोरीच्या दुचाकी असा एकूण सहा लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपकिभागीय पोलीस अधिकारी शीतल जानके-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, बापूराव धायगुडे, जितेंद्र इंगुळकर, आनंदा भोसले, शंकर घाडगे, रविराज कर्णेकर, सागर मोहिते, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलवडे यांनी ही कारवाई केली.