देशनिष्ठ धाडसी झंझावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. ज्योती धर्माधिकारी

जॉर्जिया रशियाची एकेकाळी वसाहत असलेला देश. देश स्वतंत्र झाला (1991) तरी रशियाची या देशातील लुडबुड थांबलेली नाही. नुकतेच 2019 पासून रशियाने जॉर्जियाला दळणवळण बंद केले होते ते निर्बंध उठवले. 15 मे 2023 पासून व्हिसामुक्त प्रवासाला मान्यता दिली आहे. असे चिथावणीखोर कृत्य जॉर्जियासाठी अस्वीकृत आहे हे सालोमे झुराबिच्वीली या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले. नियुक्ती दिनांकापासून रशियाविरुद्ध दंड ठोकून उभी असलेली सालोमे झुराबिच्वीली ही अत्यंत धाडसी राजकारणी ठरली आहे. पंतप्रधानांचे मत हे अनुकूल नसतानाही देशाच्या हितासाठी झुराबिच्वीली कटिबद्ध आहेत.

युाsढन-रशियाच्या युद्ध परिस्थितीचे पडसाद संपूर्ण युरोप नव्हे संपूर्ण जगभर उमटले आहेत. रशियाच्या भूमिकेशी असहकार ही युरोपियन देशांची नीती आहे. त्यातल्या त्यात रशियाच्या सीमावर्ती देशांमध्ये तणावजन्य परिस्थिती आहे. जॉर्जिया हा देश या तणावजन्य परिस्थितीला अपवाद नाही.

जॉर्जिया हा रशियाची एकेकाळी वसाहत असलेला देश. देश स्वतंत्र झाला (1991) तरी रशियाची या देशातील लुडबुड थांबलेली नाही.  2019 पासून रशियाने जॉर्जियाला दळणवळण बंद केले होते. ते निर्बंध उठवले 15 मे 2023 पासून आणि आता व्हिसामुक्त प्रवासाला मान्यता दिली आहे. असे चिथावणीखोर कृत्य जॉर्जियासाठी अस्वीकृत आहे हे सालोमे झुराबिच्वीली या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले.

नियुक्ती दिनांकापासून रशियाविरुद्ध दंड ठोकून उभी असलेली सालोमे झुराबिच्वीली ही अत्यंत धाडसी राजकारणी ठरली आहे. ‘ज्या कारणासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले या कारणासाठी तुम्ही कार्य केले पाहिजे,’ अशी कानउघाडणी सभेतील भाषणांमध्ये त्या करत असतात.

सालोमे झुराबिच्वीली (18 मार्च 1952) पॅरीस येथे एका जॉर्जियन शरणागत कुटुंबामध्ये जन्मलेली मुलगी. 1921 च्या युद्धात त्यांचे कुटुंब फ्रान्समध्ये विस्थापित झाले. त्यांचे बालपण हे दोन वेगवेगळय़ा पातळय़ांवर गेले. फ्रान्समध्ये राहात असल्यामुळे शिक्षणापासून ते सामाजिक जीवन हे फ्रेंच होते तर कुटुंबातले वातावरण आणि संवेदना जॉर्जियन होत्या. झुराबिच्वीली यांनी पॅरीसमधून राज्यशास्त्र या विषयामध्ये पदवी मिळवली. झुराबिच्वीली अतिशय हुशार, चमकदार विद्याथिनी होत्या. त्यांचे विषयदेखील ‘शीतयुद्धाचे राजकारण,’ ‘युरोपातील ाढांती आणि प्रपांती’ असे होते. त्या सांगतात, राज्यशास्त्र हा विषय निवडताना आपण जॉर्जियाला परत जाऊ आणि आपल्या अभ्यासाचा जॉर्जियाला उपयोग होईल, ही सुप्त इच्छा मनात होती. अर्थात ती शक्यता फारशी नव्हती. कारण जॉर्जियाला परत जाण्याचे रस्ते बंद झालेले होते. शिक्षकी पेशाने त्यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली. रशियाविरोधी पेपर त्या शिकवत असत. त्यावरून  झुराबिच्वीलीचा मानसिक प्रवास समजून घेता येतो.

वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी फ्रेंच राजनैतिक सेवा सुरू केली. काही काळ त्या फ्रेंच राजदूत म्हणूनही काम करत होत्या. वॉशिंग्टनमधल्या फ्रेंच दूतावासामध्ये सचिव म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. या पदावर असताना त्यांना 1986 मध्ये जॉर्जियाला जाण्याची संधी मिळाली. पुढे 2003-04 मध्ये त्या फ्रेंच सरकारच्या जॉर्जिया येथील राजदूत म्हणून काम करत होत्या. या ठिकाणी मात्र खऱया अर्थाने झुराबिच्वीलीसाठी

जॉर्जियाचे दरवाजे उघडले. 18 मार्च 2004 रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिखाईल साकाश्विली यांनी त्यांची जॉर्जियन परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली. या पदावर काम करणारी ती पहिली स्त्राr ठरली. त्याचवेळी त्यांनी जॉर्जियन नागरिकत्व स्वीकारले.

परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना जॉर्जिया भूभागावरती जिथे जिथे रशियन सैनिक आहेत त्यांना परत पाठवण्याचे काम त्यांनी केले. याच काळात जॉर्जियावर प्रेम करणारा जॉर्जिया मित्रमंडळ संघ स्थापन झाला. या माध्यमातून पोन, लिथूयानानिया, लाट्व्हीया, रोमानिया, झेक रिपब्लिक अशी सर्व राष्ट्रे जॉर्जियाच्या मदतीसाठी सरसावली. युरोपियन एकात्मतेच्या दृष्टीन पुढे  पडलेले ते एक पाऊल होते.

2005 मध्ये मात्र झुराबिच्वीली यांनी फ्रेंच राज्यसत्तेला रामराम ठोकला आणि ‘जॉर्जियाचा मार्ग’ पक्ष स्थापन करून कायमस्वरूपी जॉर्जिया येथील राजकारणामध्ये सािढय होण्याचे निश्चित केले. पुढे त्या ‘जॉर्जियन ड्रीम’ पक्षात दाखल झाल्या, पण 2013 मध्ये राष्ट्राध्यक्ष होण्याच्या त्यांच्या मार्गामध्ये मुख्य अडचण होती की त्या जॉर्जियन-फ्रेंच नागरिक होत्या. 2016 च्या निवडणुकीमध्ये मात्र त्या भरघोस मताने निवडून आल्या आणि खासदार म्हणून संसदेमध्ये जाऊन बसल्या. या काळात जॉर्जियन घटनेमध्ये अत्यंत उलथापालथ होत होती. राष्ट्राध्यक्षांचे अधिकार कमी करून पंतप्रधानांना सगळे अधिकार देण्याचे घाटत होते. याचवेळी 2018 मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली. झुराबिच्वीली निवडून आल्या. कदाचित झुराबिच्वीली या बहुमताने निवडून येणाऱया पहिल्या आणि जॉर्जियाच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष आहेत. प्रजासत्ताक, स्वतंत्र जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली.

राजकीयदृष्टय़ा जॉर्जिया अस्थिर देश आहे. या देशाने नुकतेच सार्वभौमत्व स्वीकारले तरीही रशियाची लुडबुड थांबलेली नाही. ही डोकेदुखी कायमस्वरूपी आहे. देश अजूनही आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा स्थिरावलेला नाही. मात्र देशाचा मानव विकास निर्देशांक उच्च आहे.

राष्ट्राध्यक्ष पदावरून काम करताना देशातील काही संवेदनशील मुद्द्य़ांवर त्या महत्त्वाच्या भूमिका घेत आहेत. महिलांचे हक्क आणि समानता यासाठी त्या सातत्याने समाजमाध्यमांवर विधानसभांमध्ये बोलत असतात, अनुकूल निर्णय घेत असतात.

झुराबिच्वीलीच्या अधिकारांवर सध्या तरी गंडांतर आहे. शासन पंतप्रधानांच्या हातात एकवटले आहे. तरीही झुराबिच्वीली यांनी सरकार वठणीवर आणण्याचा आपला अधिकार सोडला नाही. कोणत्याही परिस्थितीत रशियन हस्तक्षेप मान्य करत नाहीत. या धाडसी झंझावाताचा कार्यकाळ 2024 मध्ये संपतो, त्यानंतर सांसदीय प्रणालीला वाव आहे. देशाचे स्वातंत्र, सीमांचे रक्षण, बंधुता यासाठी अजूनही काम करण्याची गरज आहे याची जाणीव झुराबिच्वीली यांना आहे आणि त्या निष्ठेने आपली भूमिका बजावत आहेत.

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत.)