
>>मृणाल घनकुटे
आपली त्वचा कोरियन त्वचेपेक्षा वेगळी… डॉ. हेमांगी राऊत सांगतात, त्वचेच्या प्रकारांचे वर्गीकरण फिट्झपॅट्रिक स्केलनुसार केले जाते. ही एक विशिष्ट प्रकारची स्केल आहे जी त्वचा फोटोटॉक्सिक होण्याआधी किती यूव्ही एक्सपोजर घेऊ शकते हे सांगते.
आपल्या देशातील तरुणांमध्ये कोरियन स्किनकेअरचे एक विशेष आकर्षण आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिराती आणि रील्सचा पूर आलेला दिसतो. अनेकांना ‘दक्षिण कोरियन’ लोकांसारखी निस्तेज त्वचा हवी आहे, परंतु हिंदुस्थानी लोकांनी कोरियनचे स्किनकेअर रुटीनचे अनुसरण करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
बोईसर येथील डॉ. त्वचा स्किन क्लिनिकच्या डॉ. हेमांगी राऊत-आंग्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियन स्किनकेअर हे 10 स्टेपवर आधारित आहे. मात्र आपल्याकडे तेवढी गरज नाही. आपल्या देशात अशी काही संसाधने आहेत जी तुम्हाला हवी तशी सुंदर त्वचा देऊ शकतात.
फिट्झपॅट्रिक स्केल तंत्रामुळे त्वचाशास्त्रज्ञांना त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण निश्चित करण्यास मदत मिळाली आहे. या स्केलनुसार हिंदुस्थानींच्या त्वचेची श्रेणी IIIed आणि vvIedच्या दरम्यान आहे. त्यात असे दिसून येते की, हिंदुस्थानी त्वचेमध्ये टॅनिंग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच डार्क सर्कल होण्याची शक्यता असते. कोरियन स्किनकेअर दक्षिण कोरियन आणि हिंदुस्थानींसाठी वेगळय़ा पद्धतीने कार्य करते.
सुंदर व निरोगी त्वचा मिळवणे हे स्किनकेअर दिनचर्येवर अवलंबून असते. दक्षिण कोरियात पारंपरिक स्किनकेअर उपायांमध्ये नैसर्गिक उत्पादने वापरतात. उदाहरणार्थ- ग्रीन टी, प्रोपोलिस किंवा मधमाशीचे गोंद आणि बांबूचे अर्क हे पिढय़ान्पिढय़ा वापरले जाणारे काही सामान्य घटक आहेत. हे घटक रासायनिक घटक आणि विषारी पदार्थांपासून त्वचेचे रक्षण करतात. त्वचा निरोगी ठेवतात.
त्वचा निरोगी ठेवणे सहजशक्य आहे. फक्त तुमची स्किनकेअर दिनचर्या नैसर्गिक घटकांपासून सुरू करा. पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची खात्री करा. सनस्क्रीन वापरा आणि झोपण्यापूर्वी मेकअप काढा. सुरुवातीला चंदनाच्या पावडरचा (लाल आणि पांढरी दोन्ही) उपयोग नैसर्गिक क्लिन्झर म्हणून करू शकतो. पाण्यावर आधारित आणि प्रोबायोटिक्स, पेप्टाइड्स असलेली क्रीम वापरणे, मॉइश्चरायझरच्या आधी हायलुरोनिक ऑसिडसह सिरम वापरणेदेखील फायदेशीर ठरू शकते.
नैसर्गिक घटकांचा करा वापर
हिंदुस्थानात आज अनेक कंपन्या आणि तज्ञ मंडळी नैसर्गिक पदार्थांवर प्रयोग करताना दिसतात. असे असले तरी त्वचेच्या आजारांवर परवडणारे आणि सुलभ उपचार, पर्याय यांच्यापासून आपण खूप दूर आहोत. त्यातल्या त्यात आपण सहज उपलब्ध होणाऱया नैसर्गिक पदार्थांचा वापर करू शकतो.
























































