शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. 46च्या वतीने राजे शहाजी क्रीडांगणावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक मधुकर राऊत, शाखाप्रमुख पैलाश कणसे यांच्यासह शाखेतील समस्त शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे स्थानक लायसन पोर्टर असोसिएशन, रेल कामगार सेना व लोकाधिकार समिती पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानक येथील कार्यालयात तसेच डिझेल लोको शेड, घोरपडी येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मोहन दुधाने, पुणे स्थानक संचालक मधुसूदन मीना, रेल्वे सामग्री व्यवस्थापक गुप्ता उपस्थित होते.

अदाणी इलेक्ट्रीसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस मंगेश दळवी यांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी खजिनदार भारत दळवी, चिटणीस उदय परब, उपाध्यक्ष सुभाष कावले, महेश कोयंडे, हेमंत लोखंडे, विजय गाडे, विकास आंब्रे उपस्थित होते.

ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 च्या वतीने घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील सिद्धी गणेश मंदिर परिसरात विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील यांनी महाराजांच्या पवित्र पुतळय़ाचे पूजन व रायगड येथील जलाने अभिषेक करून महाराजांना मानाचा मुजरा केला.