
मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा प्रसिद्ध टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आता त्याचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने हजेरी लावली होती, याभागात आपला लाडका मित्र जितेंद्र जोशीचे बोलणे ऐकून श्रेयस भावूक होताना दिसला.
View this post on Instagram
झी मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या शोमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याचा लाडका मित्र जितेंद्र जोशी त्याच्या विषयी म्हणाला की, श्रेयस अनेक गोष्टी आहेत, अनेक मनामध्ये भावना आहेत. मला जेव्हा काम नव्हतं. तेव्हा सतिश राजवाडे यांच्याकडे असिस्टंन म्हणून घेऊन जाणारा तूच होतास. असं सांगत तो पुढे म्हणाला की, मला एक किस्सा ठळकपण आठवतो तो म्हणजे तुझ्या आईने तुला सांगितले होते की, आता काहीतरी नोकरी धंदा बघ या नाटकांनी वगैरे काही होत नाही आणि आपण दोघे मिळून स्वामी समर्थ सर्कलच्या इथे स्वामींचा मठात गेलो आणि दोघांनी तिथे प्रार्थना केली आणि त्यानंतर जे झाले ते साऱ्या महाराष्ट्राने नव्हे देशाने पाहिले.दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम तब्बल 10 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


























































