
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, वृक्षारोपण अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वर्सोवा विधानसभा शाखा क्रमांक 60 च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वर्सोवा विधानसभेचे उपविभागप्रमुख राजेश शेटये यांनी शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक शैलेश फणसे, समन्वयक बाळा आंबेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप केले. शाखाप्रमुख सिद्धेश चाचे, शाखा संघटक अश्विनी खानविलकर आयोजित या कार्यक्रमात विभागातील 200 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी महिला विधानसभा संघटक बेबी फर्नांडिस, महिला समन्वयक शीतल सावंत, संजना हरळीकर उपस्थित होते.
सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान परळ यांच्या वतीने परळच्या पोईबावडी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य व बिस्कीट वाटप माजी नगरसेविका उर्मिला उल्हास पांचाळ व शाखाप्रमुख अनिल गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस आनंद गावकर, नाना फाटक, संतोष कांबळी, प्रभाकर मोराजकर, रवींद्र ओटावकर, दिनेश लोखंडे, रवी घोले, सुवर्णा गुराम व नीलाक्षी चेंदवनकर उपस्थित होते.
मालाड विभाग क्रमांक 2 चे विभागप्रमुख अजित भंडारी, मनाली चौकीदार यांच्या नेतृत्वाखाली शाखा क्रमांक 32 च्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका गीता भंडारी, संदीप कोळी, विकास दशपुते, रवींद्र भगत, गीता दमानिया, अशोक साबळे, समीप पठारे, किरण भंडारी, सरस्वती लोणकर, आकांक्षा सावंत, मीनाक्षी ठोकळे, बेबी नायर, मीना पाटील, शोभा शेकडे, श्रुती घोसाळकर, किरण कोळी, संगीता भंडारी, नेवीन दास उपस्थित होते.
युवासेना मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांच्या वतीने विभागातील विद्यार्थ्यांना मोफत बॅग, नोटबुक, नाष्टा वाटप करण्यात आले. शिवसेना सचिव सूरज चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्या तथा युवासेना कार्यकारिणी सदस्या सुप्रदा फातर्पेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपविभागप्रमुख संदीप गावडे, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख विशाल बिलये, विभाग अधिकारी आदित्य गीड्डे, युवती विभाग अधिकारी मेघना पवार उपस्थित होते.
शाखा क्र. 47 च्या वतीने चित्रकला स्पर्धा व नोटबुक वाटपाचे आयोजन उपविभागप्रमुख गणेश गुरव, शाखाप्रमुख संजय सोनावणे, मंगला सोनावणे यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानसभाप्रमुख अशोक पटेल, विधानसभा संघटक गिरीश लोटलीकर, मीना करंडे, विधानसभा निरीक्षक रवींद्र राणे, उपविभाग समन्वयक श्रद्धा गोकानी, दीपक सावंत, सुमिता पुजारी, वैशाली घाडीगावकर उपस्थित होते.



























































