
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 30 मार्चपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असता तरी पुलावर अजूनही अंधार आहे. पालिकेने अजून या पुलावर दिवे लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. गर्दीच्या वेळी पुलावर दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलासाठी सात कोटींचा खर्च करण्यात आला तरी विजेची व्यवस्था का नाही, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.



























































