
हुतात्मा चौक परिसरात महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून 7 लाख 50 हजार किमतीची केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सात जणांना जेरबंद केले.
एमटीएनएलचे हुतात्मा चौक परिसरातील जे. बी. पेटिट स्कूलजवळ काम चालू आहे. मंगळवारी त्या ठिकाणाहून साडेसात लाख रुपये किमतीची केबल चोरीला गेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले तेव्हा ती केबल एका पिकअप बोलेरो व्हॅनमधून चोरून नेताना दिसून आले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या वाहनाचा माग काढला आणि कुर्ला परिसरातून सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.






























































